धक्कादायक! फेब्रुवारीतच सातपुडा डोंगररांगांमध्ये पाणीटंचाईच्या झळा, हंडाभर पाण्यासाठी पायपीट, दरीतल्या झऱ्यातून पाणी भरण्याची वेळ

फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्यात..
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नंदुरबारमध्ये हंडाभर पाण्यासाठी महिलांना पाच ते सहा किलोमीटरची पायपीट करावी लागतेय.

दोनशे फूट खोल दरीत उतरून महिला झऱ्यातून पाणी भरताना दिसत आहेत.
मार्च महिन्यात पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याचे संकेत दिले जात असताना आतापासूनच सातपुड्यात पाण्याचं दूर्भिक्ष जाणवत आहे.
डोंगररांगात पाणी मिळत नसल्यानं महिला साचलेल्या पाण्याने कळशा, हंडे भरताना दिसत आहेत.
हर घर नल योजना, जलजीवन मिशन अशा कितीतरी योजना सातपुड्यात निष्प्रभ ठरलेल्या दिसतात. वाहतूकीची कोणतीही सोय नाही. परिसरात पाणीच येत नसल्याने महिलांना हंडाभर पाण्यासाठी साचलेल्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे.
साचलेले पाणी पिण्यास किती घातक असू शकते हे नव्याने सांगायची गरज नाही.एकीकडे GBS वरून दुषीत पाण्यावरून प्रशासन जागं झालंय असं सांगितलं जात असताना महाराष्ट्रातला एक भाग पाण्यासाठी कोणत्या स्थितीत आहे हे पाहण्याची गरज आहे.
शासकीय पाणीपुरवठा योजना कागदावरच जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात येणारी कामे गेल्या दोन वर्षापासून अपूर्ण स्थितीत आहेत.
आदिवासी दुर्गम भाग फक्त घोषणांसाठीच का संतप्त नागरिकांचा सवाल आहे.