MNS Deepotsav २०२३: शिवाजी पार्कवर मनसेचा दिपोत्सव, दिग्गजांच्या हस्ते दीपोत्सवाचे उद्घाटन!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (MNS) दरवर्षी दीपोत्सवाचं (Deepotsav 2023) आयोजन केलं जातं. ( Photo Credit : FB / Raj thackeray )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमनसेच्या 'दिपोत्सव 2023' या कार्यक्रमाचं आयोजन मुंबईतील शिवाजी पार्कात (Shivaji Park) करण्यात आलं आहे. ( Photo Credit : FB / Raj thackeray )
यंदाचा हा दीपोत्सव खूपच खास असणार आहे. मनसेच्या दीपोत्सवात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. ( Photo Credit : FB / Raj thackeray )
शिवाजी पार्कवर होणाऱ्या दीपोत्सवाची मनसैनिक आतुरतेने वाट पाहत असतात. मनसेच्या दीपोत्सवाचं यंदा अकरावे वर्ष आहे. ( Photo Credit : FB / Raj thackeray )
लेखक सलीम खान आणि गीतकार जावेद अख्तर (Salim-Javed) यांच्या शुभहस्ते 'दिपोत्सव 2023'चं उद्धाटन झाले. हा कार्यक्रम 9 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 6.30 वाजता शिवाजी पार्कवर पार पडला.( Photo Credit : FB / Raj thackeray )
बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटेल की इथं जावेद अख्तर कसे. जावेद अख्तर नास्तिक आहेत आणि धार्मिक कार्यक्रमाला कसे येतात. पण राज ठाकरे त्यांचे घनिष्ठ मित्र आहेत. ( Photo Credit : FB / Raj thackeray )
हिंदुंचं मन विशाल असतं त्यामुळे ही संस्कृती तितकीच समृद्ध आहे. आम्ही हिंदूकडून जगण्याचं कौशल्य शिकलो आहोत, असं जावेद अख्तरांनी म्हटलं. ( Photo Credit : FB / Raj thackeray )
मी अशा देशात जन्मलो आहे की, ज्या देशात राम आणि सीता यांचा जन्म झाला आहे. श्रीराम आणि सीता हे फक्त हिंदूचे दैवत नाहीत, तर देशातील सर्व नागरिकांचे दैवत असल्याचे मत ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी व्यक्त केलं.( Photo Credit : FB / Raj thackeray )
नातवाला मांडीवर घेत राज ठाकरे मनसेच्या दादरमधील दिपोत्सवात ( Photo Credit : FB / Raj thackeray )
शिवतीर्थावर, तिथल्या रस्त्यांवर, झाडांवर रोषणाई करण्यात येत असते. मनसेच्या दीपोत्सवात मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारदेखील हजेरी लावत असतात. हा दीपोत्सव तुळसी विवाहापर्यंत सुरू असतो.( Photo Credit : FB / Raj thackeray )