PHOTO: मिसेस भारत यूएसए विठुरायाच्या चरणी; अमेरिकेतून थेट पंढरपुरात येऊन घेतलं विठ्ठलाचं दर्शन
अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे उद्योजक श्वेताली जकाते यांना जागतिक व्यासपीठावर प्रतिनिधित्व करताना मिसेस भारत युएसए 2022 खिताब देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजागतिक पातळीवर सौदर्य स्पर्धेत मिळालेल्या या मोठ्या यशानंतर आज श्वेताली यांनी आपल्या कुटुंबासमवेत अमेरिकेतून येत आपले कुलदैवत असलेल्या विठुरायाचे दर्शन घेतले
श्वेताली यांनी नोव्हेंबर 2022 मध्ये अमेरिकेत प्रथम राज्यस्तरीय स्पर्धा जिंकली
त्यानंतर 10 डिसेंबर 2022 रोजी राष्ट्रीय स्पर्धा जिंकली.
जॉर्जिया येथे मिस युनिव्हर्स 2021 मधील विजेती हरनाज संधू हिने तिला मुकुट परिधान केला .
कॅलिफोर्निया येथील सॅन फ्रान्सिस्को एरियामध्ये श्वेताली आपल्या कुटुंबासह राहते.
सॅन फ्रान्सिस्को बे एरिया येथे भारतातील प्रिस्कुलानी तंत्रज्ञानावर आधारित ऑनलाईन शैक्षणिक क्षेत्रात योगदान देत आहे.
माय ड्रीम टीव्ही यूएसए द्वारा आयोजित जागतिक व्यासपीठावर भारत आणि भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व करून तिने आता आपली क्षमता सिद्ध केली आहे.
श्वेताली जकाते यांचे विठ्ठल हे कुलदैवत असल्याने त्या आज आपले पती , मुले आणि कुटुंबासह विठुरायाच्या चरणी आल्या होत्या .
यावेळी श्वेतालीने आपल्या सौदर्याचे रहस्य , ब्युटी टिप्स यावर तिनं एबीपी माझाशी बातचीत केली.