PHOTO: वारकऱ्यांपाठोपाठ महानुभाव पंथाकडूनही सुषमा अंधारेंना विरोध
'रेड्याला शिकवण्याचे सामर्थ्य इथल्या संतांमध्ये आहे म्हणून चमत्कार, ...अरे, तुम्ही रेड्यांना शिकवले रे, माणसांना कुठं शिकवलं तुम्ही, असे विधान अंधारे यांनी केले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यांच्या याच विधानावरून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी वारकरी संप्रदायाने केली आहे.
तर आता वारकऱ्यांपाठोपाठ महानुभाव पंथाकडूनही सुषमा अंधारेंना विरोध होताना पाहायला मिळत आहे.
सुषमा अंधारे यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी देखील यावेळी महानुभाव पंथाकडून करण्यात आली आहे.
औरंगाबदेतील महानुभाव आश्रमामध्ये साधकांनी श्रीकृष्णाला साक्षी मानत ज्या पक्षात सुषमा अंधारे राहतील त्या पक्षाला आम्ही मतदान करणार नाही अशी समूहिक प्रतिज्ञा केली.
यावेळी मोठ्याप्रमाणावर महानुभाव पंथाच्या साधकांची उपस्थिती पाहायला मिळाली.
सुषमा अंधारे यांनी आमच्या दैवताबद्दल, भगवान श्रीकृष्ण चक्रवतींबद्दल अपशब्द वापरले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.