Mothers Day : मदर्स डे निमित्त मदर टेरेसा, सिंधूताई सपकाळ यांची रांगोळी
आईच्या उपकाराची परतफेड व आई प्रति प्रेम व्यक्त करणारा दिवस म्हणजे मातृदिन!
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जागतिक मातृदिन साजरा करण्यात येतो.
मातृत्व दिनाचे औचित्य साधत गोंदियातील प्रसिद्ध रांगोळी चित्रकार सोनी फुलसुंगे या तरुणीने ही रांगोळी काढली आहे.
तिने अनाथांची माय सिंधुताई सपकाळ आणि मदर टेरेसा यांची रांगोळी काढली आहे.
स्वामी तिन्ही जगाचा आई विना ना भिकारी हे आपल्या रांगोळीच्या कलेतून दर्शविले आहे.
सिंधुताई सपकाळ यांनी हजारो बालकांचे रक्षण करीत त्यांना आईची माया दिली.
तर समाजसेविका मदर टेरेसा यांनी स्वतः साठी नाही तर दुसऱ्या साठी जगा असा सल्ला देत हजारो अनाथ बालकांना मातृत्व दिलं.
आई या शब्दाचे जीवनात काय मोल असतं हे सोनी फुलसुंगे यांनी रांगोळीच्या माध्यमातून सांगितलं आहे.
सोनी फुलसुंगे यांनी मातृदिनानिमित्त या माऊलींना अनोखा सलाम केला आहे.
ही रांगोळी पाहून लोकांनी देखील तिचं कौतुक केलं आहे