PHOTO : वीर योद्धा! वय अवघं 23 वर्ष; दहशतवाद्यांशी लढताना सांगलीतील जवान रोमितला वीरमरण, गाव हळहळलं
Sangli News Updates : जम्मू-काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यातील झेनपुरा येथे दिनांक 19 फेब्रुवारी 2022 रोजी आतंकवाद्यांच्या शोध मोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत सांगलीच्या वाळवा तालुक्यातील शिगाव येथील रोमित तानाजी चव्हाण (Romit Chavan) यांना वयाच्या 23 व्या वर्षी यांना वीरमरण आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचव्हाण यांची शिगाव गावातून अंत्ययात्रा गावातून वारणा नदीकाठी आली. वारणा नदीकाठी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
वेळी पालकमंत्री जयंत पाटील, माजी मंत्री सदाभाऊ खोत प्रशासकीय अधिकारी आणि गावकरी उपस्थित होते. अत्यंत शोकाकुल वातावरणात अमर रहे अशा घोषणा देत अंत्यसंस्कार करण्यात आले.
पालकमंत्री जयंत पाटील यावेळी दु:ख व्यक्त करत म्हटलं की, पाच वर्षापूर्वी रोमित पाच वर्षापूर्वी सैन्यात सामिल झाला. रोमित अत्यंत धाडसी असा होता. आतंकवाद्यांना प्रतिउत्तर देताना रोमितला वीरमरण आले आहे. एक अतिशय कर्तबगार असा जवान शहीद झाला. शिगाव गावचा तो बहुमान होता. आम्हा सर्वांना रोमितचा सदैव अभिमान राहिल, त्याचं योगदान आम्ही कधी विसरणार नाही, असं पाटील म्हणाले.
जम्मू- काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिगाव गावचा 23 वर्षीय रोमित तानाजी चव्हाण शहीद झाले.
जम्मू- काश्मिरमधील शोपियांमध्ये झालेल्या चकमकीत दोन सुरक्षा जवान शहीद झाले. या शहीद जवानांमध्ये रोमितचा समावेश होता. पाच वर्षापूर्वी रोमित हा मुंबई येथे सैन्य दलात भरती झाला. त्यानंतर मध्यप्रदेश येथील सागर येथे महार रेजिमेंटल सेंटरवर त्यांचे एक वर्षे ट्रेंनिग झाले होते.
एक वर्षापूर्वी जम्मू काश्मीर येथे 1 राष्ट्रीय रायफलमध्ये पोस्टिंग झाले.
जम्मू काश्मीर येथील शोपिया भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती भारतीय सैन्याला समजताच या भागात घेराबंदी करून सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला यामध्ये शिगाव येथील रोमित चव्हाण आणि उत्तर प्रदेश येथील संतोष यादव हे जवान शहीद झाले.
रोमितचे वडील तानाजी चव्हाण हे राजारामबापू पाटील साखर कारखाना येथे कार्यरत आहेत. आई गृहिणी आहे. तर बहिण शिक्षण घेत आहे.
शिगाव गावासह आजूबाजाच्या भागात ही बातमी समजताच सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. या घटनेनं गावावर शोककळा पसरली आहे.