Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Solapur Maratha Protest : आरक्षणासाठी सोलापूरमध्ये मराठा आक्रोश मोर्चा, तब्बल चार हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मराठा आरक्षण मिळावे यासाठी सोलापुरात आज, 4 जुलै रोजी मराठा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. छायाचित्र : चेतन लिगाडे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोनाचा संसर्ग पाहता प्रशासनाच्यावतीने या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली होती. छायाचित्र : चेतन लिगाडे
मोठ्या संख्येने आंदोलक यात सहभागी झाले. सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत हा मोर्चा निघाला. छायाचित्र : चेतन लिगाडे
सोलापूर शहरात नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये असे आवाहन पोलिसातर्फे करण्यात आले होते. छायाचित्र : चेतन लिगाडे
पोलीस बंदोबस्तामध्ये सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलीस, एसआरपीएफच्या तुकड्या, होमगार्ड, सातारा, सांगली, उस्मानाबाद इत्यादी ठिकाणाहून पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली होती. छायाचित्र : चेतन लिगाडे
या मोर्चाला नरेंद्र पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य,आमदार विजयकुमार देशमुख, आमदार राम सातपुते,आमदार राजेंद्र राऊत, राजेंद्र मिरगणे, महापौर श्रीकांचना यन्नम, पंढरपूरचे आमदार समाधान अवताडे,रणजितसिंह मोहिते पाटील,प्रशांत परिचारक माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे उपस्थित होते. छायाचित्र : चेतन लिगाडे
दुसरीकडे मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तगडा बंदोबस्त शहर आणि ग्रामीण हद्दीत तैनात करण्यात आला होता. सोलापूर शहर आणि ग्रामीण मध्ये जवळपास 4 हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. छायाचित्र : चेतन लिगाडे
नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. या मोर्चाच्या निमित्तानं शहरात येणारे सर्व मार्गवर नाकेबंदी करण्यात आली होती तर मराठा आक्रोश मोर्चाला सोलापूर शहर पोलीसांनी परवानगी नाकारली होती. मात्र असं असलं तरी मराठा आक्रोश मोर्चा काढणारच अशी भूमिका आयोजकांनी घेतली होती. त्यानुसार आजचा मोर्चा निघाला. छायाचित्र : चेतन लिगाडे
हरात येणारे सर्व प्रमुख मार्ग पोलिसांच्या वतीने सील करण्यात आले होते. मोर्चा ज्या मार्गाने जाणार आहे त्या संपूर्ण मार्गावर सीसीटीव्ही लावण्यात आले होते. छायाचित्र : चेतन लिगाडे