PHOTO : अन् रात्री 12 वाजता लागलं महादेवांचं लग्न; तेही 20 फूट खोल बारवेत...
औरंगाबाद भावसिंगपुऱ्यात एक अनोखा विवाह सोहळा पार पडला. महाशिवरात्रीला मध्यरात्री 12 वाजेच्या मुहूर्तावर जमिनीपासून 20 फूट खोल बारवेत अनोखा लग्नसोहळा पार पडला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबारवेत लग्न तेही रात्री 12 वाजता हे ऐकून आपणास नवल वाटले असेल आणि प्रश्नही पडला असेल की हा विवाह सोहळा नेमका होता कुणाचा तर मंडळी हा विवाह होता, साक्षात देवांचे देव महादेव आणि पार्वती यांचा.
या लग्नाला वन्हाडी मंडळी होते परिसरातील रहिवासी. जुन्या भावसिंगपुन्यात प्राचीन श्री सत्येश्वर शिव-पार्वती मंदिर आहे. हे मंदिर चक्क बारवेत आहे.
34 पायऱ्या उतरून गेल्यावर बारवेत पाणी लागते. त्याआधी 18 व्या पायरीवर भगवान शंकर आणि पार्वती यांचं समोरासमोर मंदिर आहे.
महाशिवरात्रीला 12 वाजता येथे शिव-पार्वतीचे लग्न लागलं. भाविक हातात अक्षता घेऊन उभे होते, देवी पार्वतीला अलंकाराने सजविण्यात आलं होतं.
लग्नासाठी खास सजावट केली होती. लग्नानंतर फटाक्यांची आतषबाजी झाली. चोहीबाजूने अंधार आणि बारवेत लख्ख प्रकाशात हा लग्न सोहळा डोळे दीपवून टाकणार होता