Mahashivratri 2022 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिवमंदिरांविषयी थोडक्यात माहिती...
मुंबईतील (Mumbai) प्रसिद्ध देवस्थान म्हणजे बाबुलनाथ (Babulnath). महाशिवरात्रीच्या दिवशी (Mahashivratri 2022) तर हे मंदिर भक्तांनी संपूर्ण भरलेले असते. याशिवाय दर सोमवारी इथे शंकराच्या भक्तांची रांग लागलेली दिसून येते. हिंदू राजा भिमदेवद्वारे साधारण12 व्या शतकात या प्राचीन मंदिराची स्थापना झाल्याचे सांगण्यात येते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंबरनाथचे शिवमंदिर (Ambarnath Shiv temple) हे 11व्या शतकातील एक ऐतिहासिक हिंदू मंदिर आहे. हे अंबरेश्वर शिव मंदिर म्हणूनही ओळखले जाते. हे मंदिर इ.स.1060 मध्ये बांधले गेले आहे. हे मंदिर दगडात सुंदर कोरलेले आहे. हे मंदिर संपूर्ण मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरातील सर्वात जुने मंदिर असून युनेस्कोने जाहीर केलेल्या जागतिक वारशांच्या यादीतही या मंदिराचा समावेश करण्यात आला आहे.
सोमेश्वर मंदिर (Someshwar Temple) नाशिकच्या उत्तरेस म्हणजे नाशिक गंगापूर रस्त्याजवळ सुमारे 4 कि.मी. अंतरावर गोदावरी नदीच्या काठी हे भगवान महादेवाचे मंदिर आहे. तेथे स्वयंभू सोमेश्वर प्रकट झाले आहेत. त्या स्थळावर सोमेश्वराचे आद्य मंदिर आहे.
कपालेश्वर मंदिर (Kapaleshwar Temple) हे देशातील पहिले मंदिर आहे जेथे नंदी भगवान शंकरासमोर नाही. नाशिक शहरातील प्रसिद्ध पंचवटी परिसरातील गोदावरी नदीच्या किनाऱ्याजवळ 'कपालेश्वर महादेव मंदिर' आहे. पुराणात असे म्हटले आहे की, भगवान शिव येथे काही काळ वास्तव्यास होते.
कुणकेश्वर (Kunkeshwar Temple) येथे श्री देव कुणकेश्वर हे एक शिवमंदिर आहे. छत्रपती शिवरायांनी स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. कुणकेश्वरला दक्षिण कोकणाची काशी म्हटले जाते. दरवर्षी कुणकेश्वरला महाशिवरात्रीच्या निमित्ताने तीन दिवसांची यात्रा भरते. या यात्रेच्या निमित्ताने देऊळ परिसरात मोठी जत्राही भरते. देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि दक्षिण काशी म्हणून समजले जाते.
मार्लेश्वर (Marleshwar Temple) हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यात आहे. येथे एका नैसर्गिक गुहेत भगवान शिवाचे जागृत समजले जाणारे शिवलिंग आहे. जवळच बारमाही वाहणारा धबधबा आहे. देवरूख नगरापासून 18 किमी अंतरावर मार्लेश्वर हे गाव आहे.