Maharashtra Weather: पुढील पाच दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता

पुढील पाच दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
12 ते 14 एप्रिलदरम्यान मध्य महाराष्ट्रात तुफान गारपिटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे

13 एप्रिलला कोकणात तर 14 एप्रिलला मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे
विदर्भात 13 आणि 14 एप्रिल रोजी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.
अवकाळी पावसामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झाली आहे.
फळबागांसह रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं बळीराजा हतबल झाला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार उद्या (13 एप्रिल) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पुन्हा गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मार्च महिन्यात राज्यातील सुमारे 28 जिल्ह्यांना अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा मोठा फटका बसला.