Photo : छ. संभाजीनगरचे पालकमंत्री भुमरे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी
अवकाळी पावसामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयात कांद्याच्या पिकाचे देखील अवकाळी पावसाने मोठं नुकसान केले असून, पीक अक्षरशः आडवे झाले आहेत.
दरम्यान पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी मंगळवारी कन्नड आणि फुलंब्री तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे.
अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी भुमरे यांनी प्रत्यक्ष जाऊन केली असून, शेतकऱ्यांशी संवाद साधला.
तसेच संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर मदत देण्यात यावी अशा सूचना देखील भुमरे यांनी केल्या.
यावेळी भुमरे यांनी नुकसान झालेल्या कांद्याच्या पिकाची पाहणी केली, तसेच झालेल्या नुकसानीबाबत जाणून घेतले.
यावेळी भुमरे यांच्यासह भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे देखील उपस्थित होते.
तर यावेळी भुमरे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत लवकरात लवकर मदत मिळवून देण्याचे आश्वासन देखील दिले.