Udayanraje Bhonsle : 'राणीसाहेबांनी नेहमीच आम्हाला साथ दिली’; पत्नीसाठी उदयनराजेंची खास पोस्ट!
खासदार उदयनराजे यांची शैली काही खास आहे. ते नेहमी आपल्या हटके स्टाईलसाठी ओळखले जातात
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज त्याच खास शैलीत उदयनराजे यांनी पत्नी दमयंती यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
उदयनराजे यांनी आपल्या ट्विटरवर पत्नी दमयंती यांच्या सोबतचा एक फोटो ट्वीट केला आहे.
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे त्याच्या पत्नीचा मोठा वाटा असतो. राजकारण, समाजकारण तसेच माझ्या सुखदुःखात नेहमी मला साथ आणि सोबत देणाऱ्या माझ्या सहचारिणी राणीसाहेब आपणास वाढदिनी शुभेच्छा. आपणास उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
उदयनराजेंनी दमयंतीराणींना शुभेच्छा देण्यासाठी केलेल्या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांच्या तुफान लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय.
उदयनराजे आणि दमयंतीराणी यांचा विवाह 20 नोव्हेंबर 2003 रोजी झाला.
उदयनराजे-दमयंतीराणींना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. (सर्व फोटो - फेसबुक)