Shiv Jayanti 2022 Pics : छत्रपती शिवाजी महाराजांची ही भव्य रांगोळी पाहिलीत का? 5000 स्केअर फुटमध्ये रेखाटलं चित्र

Shiv Jayanti 2022

1/7
 शिवजयंती निमित्ताने नंदुरबारच्या शहादा येथील तरुणीने छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य रांगोळी साकारली आहे.
2/7
शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील एका हॉलमध्ये जवळपास पाच हजार स्क्वेअर फूट जागेवर रांगोळीच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र रेखाटले आहे.
3/7
नंदुरबारच्या शहादा येथील वैष्णवी पाटील या तरुणीने एका वेगळ्या प्रकारे महाराजांना अभिवादन केले आहे.
4/7
या कलाकृती साठी या विद्यार्थिनीला पाच ते सहा क्विंंटल रांगोळी लागली आहे.
5/7
विशेष म्हणजे चार दिवसांपासून म्हणजेच जवळपास 96 तास या रांगोळीवर वैष्णवीने काम केले आहे.
6/7
वैष्णवी पाटील ही अभ्यासतही हुशार असून सध्या ती बी फार्मसीचं शिक्षण घेत आहे.
7/7
शहादा येथे पहिल्यांदा इतकी मोठी रांगोळी साकरण्यात आली आहे. दरम्यान महाराजांची ही नयनरम्य आणि भव्य रांगोळी पाहण्यासाठी परिसरातील शिवप्रेमी या ठिकाणी हजेरी लावत आहेत.
Sponsored Links by Taboola