Rain : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागानं (IMD) राज्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला असला तरीही राज्यात सध्या पावसानं दडी मारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमागील तीन ते चार दिवसापासून राज्यात पावसाचा जोर कमी झालाय.
झालाय. तुरळक ठिकाणीच पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील काही भागात जरी चांगला पाऊस झाला असला तरी अद्याप अनेक ठिकाणी पावसाची गरज आहे. हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार आजही राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकण विभागासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसचे पालघर आणि ठाणे जिल्ह्याला देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यात देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्याच्या काही भागात चांगला पाऊस झाला आहे. त्या भागात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तिथं शेती कामांना वेग आला आहे. मात्र, काही भागात अद्यापही चांगला पाऊस झाला नाही.
काही भागात चांगला पाऊस झाल्यामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.