Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rain : आज राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, वाचा कोणत्या विभाग कोणता अलर्ट
राज्याच्या विविध भागात सध्या जोरदार पावसानं (Heavy Rain) धुमकूळ घातला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. अनेक ठिकाणी पुरामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे, तर कुठं वाहतुकीवर परिणाम झाल्याचे चित्र दिसत आहे.
मुंबई उपनगरासह ठाणे, पालघर या भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. तसेच कोकण विभाग, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. यामध्ये कोकणासह मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग, कोल्हापूर, ठाणे, पालघर आणि मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
. पश्चिम महााष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यासाठी आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. तर गडचिरोली, गोंदिया आणि नांदेडजिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अवर्ट जारी करण्यात आलाय.
मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्य्यांसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.