Exit Poll 2024
(Source: Poll of Polls)
Maharashtra Rain : राज्यात वादळी पावसाची हजेरी, चांद्यापासून बांद्यापर्यंत धो धो बरसला! IN PHOTOS
पहाटेपासून मुंबईत ठिकठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. मुंबईत पावसाची संततधार सुरुच आहे. पुढील 3-4 तास मुंबईत पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवसई-विरारमध्ये आज पहाटेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली होती.या पहिल्याच पावसात सखल भागातील रस्त्यावर पाणी साचलं होतं. वसईच्या साईनगर, विश्वकर्मा नगर, समता नगर, दिवानमान, माणिकपूर रोड येथे पहिल्याच पावसात रस्त्यावर पाणी साचलं आहे.
पुणे शहरातील अनेक भागांत मुसळधार पाऊस पडला, त्यामुळे संबंधित परिसरात जिकडे तिकडे पाणीच पाणी अशी पूरस्थिती दिसून आली. येथील रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून पुणेकरांना मार्ग काढवा लागला. तर, काहींनी पाण्यात उड्या मारुन पहिल्या पावसाचा आनंद घेतला.
सिंधुदुर्गासाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
सांगली, बेळगाव, गोंदिया जिल्ह्यासंह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला असून शहरातील रस्त्यांवरुन पाणी वाहताना दिसून येते.
रत्नागिरीसाठी आज ऑरेंज अलर्ट आहे, ज्यात 100 मिमीहून अधिक पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळू शकतो.
परभणीतही मुसळधार पावसाने सगळ्यांचीच तारांबळ उडाली आहे. या ठिकाणी सर्व सखल भागांत पाणीच पाणी साचलं आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार विदर्भातही दमदार पावसाने एंट्री करत एकच दाणादाण उडवली आहे. तर आजपासून पुढील पाच दिवस विदर्भातील जवळ जवळ सर्व जिल्ह्यांना नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्याचा अंदाजही हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस पडला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हंबरवाडी-बेरडवाडी रोडवर ओढ्यातून म्हैस वाहून गेली आहे. आजही कोल्हापुरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
धाराशिवमध्ये देखील मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे. या ठिकाणी सखल भागांत पाणी साचल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे.