Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rain : कुठं जोरदार तर कुठं मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
सध्या राज्याच्या काही भागात पाऊस (Rain) पडत आहे. तर काही भागात अद्यापही चांगल्या पावसाची गरज आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाही भागात सुरु असलेल्या पावसामुळं शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
पुढील दोन दिवस म्हणजे 14 सप्टेंबरपर्यंत मुंबईसह (Mumbai) संपूर्ण कोकणात जोरदार पावसाची शक्यता आहे.
नाशिक ते कोल्हापूर पर्यंतच्या पाच जिल्ह्यांच्या पश्चिमेकडील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मध्यम पावसाची शक्यता असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव साळुंके यांनी दिली आहे.
मुंबईसह कोकण आणि नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
प्रशांत महासागरात निर्माण होणाऱ्या एल निनोमुळे भारतातील हवामानावर परिणाम होत आहे. सध्या भारतातील अनेक भागांत पावसाने दडी मारली आहे.
नंदूरबार जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळं सातपुड्यात उगम पावणाऱ्या नद्यांना पूर आला आहे.
महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसानं गेल्या चार दिवसापासून नंदुरबार जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे.
सध्या सुरु असलेल्या पासामुळं पिकांना जीवदान मिळालं आहे. त्यामुळं शेतकरी समाधानी आहेत.