Rain : राज्यातील 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा
राज्यात तुरळक ठिकाणी पावसानं (Maharashtra Rain) हजेरी लावली आहे. बहुतांश ठिकाणी पावसानं दडी मारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवाशिम जिल्ह्यात सर्वत्र पुन्हा मुसळधार पाऊस बरसला आहे. त्यामुळं आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रिसोड तालुक्यातील कोयाळी भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. अनेक भागात चांगला पाऊस बरसल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकरी पावसाची वाट बघत आहेत.
पुढील पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यासह इतर काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबईसह ठाणे, पालघर, वाशिम, यवतमाळ, नंदूरबार या जिल्ह्यातही पावसानं चांगली हजेरी लावली.
यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला आहे. गेल्या तीस वर्षात इतका पाऊस गावात पडला नव्हता.
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून पावसाची संततधार सुरु आहे. सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये मुसळधार पाऊस सुरु असल्याने जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आले आहेत.
पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातील सर्वात जास्त क्षमता असलेल्या सूर्या प्रकल्पातील धामणी धरणामध्ये तब्बल 50 टक्के पाणीसाठा झाला आहे.