यवतमाळ: शेतकऱ्यांवर अस्मानी संकट, ढगफुटी सदृश्य पावसाने बळीराजाचे स्वप्न गेले वाहून; पाहा फोटो
नेर तालुक्यातील ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला. गेल्या तीस वर्षात इतका पाऊस गावात पडला नव्हता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइकडे शेतकऱ्यांनी जमिनीत स्वप्न पेरले होते. मात्र तो साखर झोपेत असतानाच त्याचे हे स्वप्न या पावसाने पुरते वाहून नेले.
ज्या मातीच्या आधारे हे स्वप्न वर येते त्या मातीसहित या स्वप्नांचा दगडी चिखल झाला आहे. शेतात फक्त दगड आणि खड्डे उरले आहेत.
मुसळधार कोसळलेल्या पावसाने सावरगाव, गोळेगाव , ब्राह्मनवाडा, शिरजगाव,पांढरी, पिंपळगाव काळे शिवारातील जवळपास 114 हेक्टर जमिनीवरील पिके पूर्णतः उध्वस्त झाल्याचा अंदाज आहे.
एका पावसाने शेतकरी उघड्यावर पडले आहे. उद्ध्वस्त शेतशिवार अन् बांधा वरील हतबल बळीराजा हे दृश्य काळजाच्या ठिकऱ्या उडवणारे आहे.
पावसामुळे जमीन खरडून गेली आहे. ती दुरुस्त करण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांपुढे आहे. मागच्या वर्षीची अतिवृष्टी ,नापिकी यातून सावरत नाही तोच यावर्षी मुसळधार पाऊस दारावर आला.
सावरगाव येथील शेतकरी प्रवीण भोयर यांच्या चार भावांच्या कुटुंबात 28 एकर शेती आहे. यातील जवळपास वीस एकर शेतातील उभे पीक उध्वस्त झाले आहे. त्यांच्या शेतातील जवळपास चार एकर जमीन पार खरडून गेली आहे.
साखळी नदीला जोडणारा नाला फुटल्याने त्याचे पाणी शेतात शिरले अन् पाहता पाहता सारे पीक वाहून गेले. यात या शेतकऱ्यांचे बी, बियाणे, खते, मजुरी असे लाखो रुपयांचे नुकसान तर झालेच पण माती खरडून गेल्याने जमीन पडीत पडणार आहे.
शेतातील पीक गेलं, पावसाने माती ही नेली खरडून, आधीच कर्ज कडून लागवड केली आता बियाणे घ्यायला पैसे आणायचे कुठून अन् पेरायला मातीच नाही तर पेरायचे काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
मुलाचे शिक्षण, मुलीचे लग्न, औषधोपचार कसा करायचा? असंख्य प्रश्नांची मालिका या पावसाने शेतकऱ्यांपुढे उभी केली आहे.आता हे सर्व शेतकरी मदतीसाठी प्रशासनाकडे आस लावून बसले आहे.