Marathi Sahitya Sammelan : 95 व्या साहित्य संमेलनासाठी उदगीर नगरी सज्ज; हजारो हात तयारीत गुंतले
साहित्य संमेलनासाठी उदयगिरी महाविद्यालयाच्या 36 एकर परिसरात सात व्यासपीठ तयार करण्यात आले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयोजक असलेल्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, सैनिक शाळा आणि शहरातील इतर संस्थेत काम करणारे 310 कर्मचारी मागील चार महिन्यांपासून काम करत आहेत. 1200 स्वयंसेवक त्यांच्या मार्गदर्शनात येथे कार्यरत आहेत. विविध विभागात कामे वाटून देण्यात आली आहेत.
या महाविद्यालयाच्या 36 एकर परिसरात सात व्यासपीठ तयार करण्यात आले आहेत. मुख्य व्यासपीठाच्या ठिकाणी 10 ते 12 हजार प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर, सहा व्यासपीठ ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी प्रत्येकी 1 हजार रसिकांची आसनव्यवस्था करण्यात आली आहे.
प्रत्येक व्यासपीठाच्या सभामंडपात प्रेक्षक आले तर त्यांना थंड पाण्याची सुविधा कार्यरत करण्यात आली आहे.100 पेक्षा जास्त जम्बो कुलर लावण्यात येणार आहेत. प्रत्येक मंडपात 10 फुटावर एक पंखा बसविण्यात आला आहे. विविध सेवाभावी संस्थेमार्फत लिंबूपाण्याची सोय करण्यात येत आहे.
मान्यवरांसाठी सहा ठिकाणी हेलिपॅड तयार करण्यात आले आहेत. भोजन व्यवस्थेवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. यासाठी सकाळ-संध्याकाळ मिळून 10 हजार लोकांची भोजनव्यवस्था करण्यात आली आहे.
साहित्य संमेलनासाठी 350 साहित्यिकांसह 1000 निमंत्रित येणार आहेत. त्यांच्या निवासासाठी उदगीर 140 बिदर 30 आणि लातूर 40 रूमची सोय करण्यात आली आहे. तसेच उदगीर शहरातील विविध महाविद्यालयात रूमची व्यवस्था करण्यात आली आहे.