PHOTO : कोण आला रे कोण आला... शिवसेनेचा वाघ आला..., 'वर्षा'वर दुमदुमल्या उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ घोषणा
उद्धव ठाकरे यांनी आज 'वर्षा' निवासस्थान सोडलं आणि 'मातोश्री'कडे निघाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्धव ठाकरे 'वर्षा'मधून बाहेर आल्यावर त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला.
उद्धव ठाकरे हे वर्षावरून बाहेर येताना लोकांनी एकच गर्दी केली.
लोकांनी एवढी गर्दी केली होती की उद्धव ठाकरेंना त्यांच्या गाडीपर्यंतही पोहोचता येत नव्हतं.
त्यावेळी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे त्यांच्यासोबत होते.
यावेळी लोकांनी शिवसेनेच्या आणि उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.
आवाज कुणाचा...शिवसेनेचा, उद्धव साहेब तुम आगे बढो...हम तुम्हारे साथ है.... अशा घोषणा देण्यात आल्या.
कोण आला रे कोण आला... शिवसेनेचा वाघ आला... या घोषणेने हा परिसर दुमदुमला.
यावेळी शिवेसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं.
आम्ही तुमच्या सोबत आहोत असा विश्वास या कार्यकर्त्यांनी दिला.
image 12
उद्धव ठाकरे यावेळी भावूक झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे शिवसेना आणि बंडखोर आमदारांच्या संघर्षाला आता भावनिक रुप आल्याचं पाहायला मिळतंय.
तिकडून काय सांगता, तोंडावर सांगा, मी राजीनामा द्यायला तयार आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.