Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शिवसेनेचे आणखी एक मंत्री शिंदेंच्या गळाला, गुलाबराव पाटील गुवाहाटीत दाखल
महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या बंडाला वेगळे वळण मिळाले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेनेत दोन दिवसांपासून संघर्ष सुरु आहे आणि या संघर्षावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मौन सोडलं.
मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधताना थेट बंडखोर आमदारांना आवाहन केलंय.
एकनाथ शिंदेंच्या बैठकीचे काही एक्स्क्लुझिव्ह फोटो समोर आले आहेत.
गुलाबराव पाटील गुवाहाटीला पोहोचले आहेत.
गुलाबराव पाटील, योगेश कदम, निर्मला गावित आणि चंद्रकांत पाटील हे आमदार गुवाहाटी मधील 'रेडीसन ब्लू' हॉटेलमध्ये पोहोचले.
तुम्हाला जर मुख्यमंत्रिपदी मी नको असेन तर समोर या आणि सांगा.. राजीनामा देतो असं मुख्यमंत्री म्हणाले.
मविआतून बाहेर पडण्यावर एकनाथ शिंदे ठाम आहेत.
मुख्यमंत्री ठाकरेंचा प्रस्ताव शिंदेंनी धुडकावला. महाराष्ट्र हितासाठी निर्णय घेणं गरजेचं असल्याचं वक्तव्य केले आहे