Maharashtra News: महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार!
. राजभवनातील दरबार हॉलमध्ये आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज अजित पवारांनी विरोधी पक्ष नेत्याचा राजीनामा देत शरद पवारांच्या नेतृत्वाला रामराम केला आहे. अजित पवारांनी चार वर्षात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.
पहाटेच्या शपथविधीनंतर आता दुपारच्या शपथविधीच्या चर्चा होणार आहे. पहाटेच्या शपथविधीवरुन शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आरोप-प्रत्योराप झाले होते.
पहाचेच्या शपथविधीनंतर 72 तासात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे सरकार पडले होते.
मात्र, आता दुपारी अजित पवार यांनी शपथविधी घेतली आहे. अजित पवारांसह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ,धनंजय मुंडे, आदिती तटकरे ,धर्मरावबाबा अत्राम,संजय बनसोडे ,अनिल पाटील यांनी मंत्री पदाची शपथ घेतली
अजिप पवारांसोबत राष्ट्रवादीचा एक गट शिंदे-फडणवीस सरकारसोबत सामील झाला आहे. राष्ट्रवादीचे 40 आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चन्द्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
मात्र राष्ट्रवादीचे फक्त आमदारचं नव्हे तर 2 खासदार देखील अजित पवारांच्यासोबत गेले आहेत. सध्या राजभवनात खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे दोन्ही खासदार उपस्थित आहे. त्यामुळे शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
अजित पवारांसह काही आमदारांनी भाजपसोबत सत्तास्थापनेचा मार्ग निवडलाय. यानिमित्ताने जुन्या शपथविधीच्या आठवणी ताज्या झाल्यात. 23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवनात देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. पहाटेच्या शपथविधीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती.
23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवनात देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. पहाटेच्या शपथविधीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती.
त्यानंतर आज चार वर्षांनी 2 जुलै 2023 ला पुन्हा हेच चित्र पहायला मिळतंय. त्यावेळी पहाटेचा शपथविधी झाला होता आज मात्र दुपारच्या मुहूर्तावर अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलीय आहे.