In Pics : पैठणीच्या शेलावर साकारली श्री स्वामी समर्थांची प्रतिमा
जगप्रसिद्ध पैठणी म्हणून येवल्याची पैठणी प्रसिद्ध असून येथील पैठणी विणकर विविध कला पैठणी साडीवर नेहमीच साकारत असतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयेवला तालुक्यातील पारेगाव येथील संतोष जेजुरकर हे प्रसिद्ध पैठणी विणकर म्हणून प्रसिद्ध आहे.
संतोष जेजुरकर यांनी पैठणी शेल्यावर श्री स्वामी समर्थ यांचे चित्र साकारले आहे.
जेजुरकर यांनी विणकाम करून साकारलेली पैठणीचा शेला अक्कलकोट येथे देणार आहे.
या पैठणी कारागिराला श्री स्वामी समर्थचे चित्र पैठणीच्या शेल्यावर काढण्याकरता 15 दिवसांचा कालावधी लागला आहे.
कारण हुबेहुब चित्र पैठणीवर साकारणे सुध्दा जिकरीच होते.
तसेच यानंतरही विविध असे निसर्गाचे तसेच देवदेवतांचे चित्र पैठणीवर साडीवर साकारणार असल्याचा मानस या विणकर संतोष जेजुरकर यांचा आहे.
कारागिराने पैठणीवर श्री स्वामी समर्थ साकारल्याने त्याचे परिसरातून कौतुक होत आहे.