Dhananjay Munde : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, ब्रिच कँडी रुग्णालयातून घराकडे मुंडे रवाना
राष्ट्रवादी काँग्रेसचे (National Congress Party) आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या 16 दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
धनजंय मुंडेना डिस्चार्ज देण्यात आला. या वेळी पत्नी राजश्री मुंडे उपस्थित होत्या. कार्यकर्ते देखील होते.
धनंजय मुंडे यांच्या गाडीला 5 जानेवारीला अपघात झाला होता. या अपघातात धनंजय मुंडे यांच्या छातीला मार लागला होता.
धनंजय मुंडे यांच्या छातीच्या बरगड्यांना मार लागल्यामुळे दोन बरगड्या फ्रॅक्चर झाल्या होत्या
अपघातात त्यांच्या डोक्यालाही काही जखमा झाल्या होत्या. परंतु डोक्याला झालेल्या जखमा बाहेरून झाल्या होत्या
सध्या त्यांची प्रकृती सुधरली असून पुढील काही दिवस आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
परळीहून आपल्या राहत्या घरी जाताना मुंडेंच्या बीएमडब्ल्यू (BMW) ला अपघात झाला होता.
चालकाचा ताबा सुटल्यानं अपघात झाला. या अपघातामध्ये बीएमडब्ल्यू कारचा पुढच्या भागाच मोठं नुकसान झाले.
अपघातात धनंजय मुंडेच्या गाडीचा चक्काचूर झाला. एअरबॅग्स उघडल्या. एअरबॅग्स उघडल्यामुळेच मोठा अनर्थ टळल्याचं बोललं जात आहे.