PHOTO: अन्यथा कारवाई! कृषिमंत्र्यांचा पीक विमा कंपन्यांना इशारा
विभागीय आयुक्त कार्यालयात कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2022 मधील झालेल्या नुकसानीसंदर्भात आढावा घेतला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशेतकऱ्यांच्या विम्याच्या प्रश्नावर शासनाकडून सातत्याने आढावा घेतला जात असल्याचं सत्तार म्हणाले.
विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत तर, चालढकल करणाऱ्या विमा कंपन्यांना जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल असेही सत्तार म्हणाले.
नैसर्गिक आपत्तीत निश्चित झालेल्या 1073 कोटी रुपये नुकसान भरपाई पैकी फक्त 96.53 कोटी रक्कम 3 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाली आहे.
त्यामुळे रक्कम तत्काळ निश्चित करण्याच्या सूचना सत्तार यांनी दिल्या.
विम्याच्या प्रलंबित प्रस्तावांवर पाच दिवसात कार्यवाही करुन येत्या आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विम्याची रक्कम जमा करावी,असेही सत्तार म्हणाले.
राज्यातील एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना देखील सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.