PHOTO: औरंगाबादमध्ये 66 लाखांचा गांजा पकडला
शुल्क विभागाने कारवाई करत कापसाच्या शेतात गांजा लावणाऱ्यांवर कारवाई केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयाप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
रामभाऊ अमृता तांदळे, सुखलाल फंदुसिंग जंगाळे, कारभारी शामलाल गुसिंगे असे आरोपींचे नावं आहे.
रामभाऊ तांदळे यांच्या गणोरी शिवारातील गट क्र. 24 मधील उस व कपासीचे पिकामध्ये गाजांचे आठ ते दहा फुट उंचीचे एकुण 45 झाडे ज्याचे एकुण वजन 520 किलो आहे.
सुखलाल फंदुसिंग जगांळे यांच्या मालकीच्या निधोना शिवारातील गट न. 125 मधील कापसाच्या पिकामध्ये गाजांचे सात ते आठ फुट उंचीचे एकुण 40 झाडे ज्याचे एकुण वजन 53 कि.ग्रॅ. आढळून आला. सोबतच शेतात सुखलेला 10 किलो गांजा देखील मिळून आलेला आहे.
कारभारी शामलाल गुसिंगे यांच्या निधोना शिवारातील गट न. 119 मध्ये छापा मारला असता, कापसाच्या पिकामध्ये गाजांचे पाच ते सहा फुट उंचीचे एकुण 22 झाडे ज्याचे एकुण वजन 75 कि.ग्रॅ. मिळून आलेले आहे.
तिन्ही शेतकऱ्यांच्या शेतात एकूण 107 गांजाचे झाडे जप्त करण्यात आले आहे.
संपूर्ण कारवाईत वजन 648 किलो ओला व सुखलेला 10 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत एकूण 66 लाख 5 हजारांचा गांजा जप्त करण्यात आला