दोन पवार... वार-पलटवार; अजित पवारांचा थोरल्या पवारांवर निशाणा, शरद पवार म्हणतात...
या बैठकीत शरद पवार गट आणि अजित पवार गट दोघांकडूनही जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. तसेच, अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीत व्यासपीठावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं छायाचित्र लावण्यात आलं होतं. यावर थोरल्या पवारांनी आक्षेप घेतला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजे लोक माझा फोटो वापरतात त्यांना माहिती आहे त्यांचं नाणं चालणार नाही, असं म्हणत शरद पवारांनी जोरदार टोला लगावला. भाजपकडे गेलेल्या अजित पवारांवरही शरद पवारांनी टिकास्त्र डागलं. काही दिवसांपूर्वीच पीएम मोदींनी राष्ट्रवादीला भ्रष्ट पक्ष म्हटलं होतं, मग आता कसं चालतंय? असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला.
तसेच, अजित पवार गटाच्या वतीनं राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्हावर दावा करण्यात आला आहे. याबाबत बोलताना शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शरद पवार म्हणाले की, पक्षाचं निवडणूक चिन्ह कुणालाही काढून घेऊ देणार नाही. ते म्हणाले, आज आपण सत्तेत नसलो तरी जनतेच्या हृदयात आहोत.
काल झालेल्या या घटनाक्रमात बंडखोर गटानं शरद पवारांना राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदावरुन हटवून त्याऐवजी अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष नेमलं आहे. निवडणूक आयोगाला लिहण्यात आलेल्या पत्रातही बंडखोर गटाकडून त्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
अजित पवारांनी कालच्या बैठकीत बोलताना थोरल्या पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, शरद पवार आजही माझे आदर्श आहेत. मात्र माणूस वयाच्या साठीनंतर रिटायर होतो, मात्र माणसानं कधीतरी थांबावं... तरूणांना संधी कधी देणार? तुम्ही आशीर्वाद द्या ना, मार्गदर्शन करा, चुकलं तर तुम्ही आम्हाला दुरूस्त करा, कान धरा...
अजित पवारांचा दावा आहे की, त्यांच्याकडे 53 पैकी 31 आमदारांचं समर्थन आहे. तर शरद पवार गटाकडे 16 आमदार, एक अपक्ष आमदार, 3 एमएलसी आणि 6 खासदारांचं समर्थन आहे.
अजित पवार शरद पवारांबद्दल म्हणाले, तुम्ही मला सर्वांसमोर खलनायक दाखवताय, पण मला त्यांच्याबद्दल (शरद पवार) खूप आदर आहे. तुम्ही सांगा की, आयएएस अधिकारी वयाच्या 60 व्या वर्षी निवृत्त होतात. भाजपचे नेतेही 75 व्या वर्षी निवृत्त होतात. लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्या उदाहरणावरून तुम्ही हे समजू शकता... मग तुम्ही कधी थांबणार आहात की, नाही?