Maharashtra Monsoon : राज्यात पुढील 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता, मुंबई आणि मध्य महाराष्ट्रात कोकणात पावसाचा अंदाज
मुंबईसह राज्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली आहे. पुढील 48 तासांत मुंबई, ठाणे मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई आणि मध्य महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागात पुढील 48 तासांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
सोमवारी पहाटेपासून राज्याच्या अनेक भागात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. मुंबई, मुंबई उपनगरासह ठाणे जिल्ह्यात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे अखेर उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
मुंबईच्या विविध भागात चांगला पाऊस कोसळत आहे. त्यामुळं हवामान विभाग मुंबईत मान्सून दाखल झाल्याची घोषणा केली.
विकेंडच्या दिवशी पाऊस झाल्याने मुंबईकरांनी पावसाचा मनसोक्त आनंदही घेतला. विविध जिल्ह्यात पावसानं हजेरी लावल्यानं बळीराजाही सुखावला आहे.
वसई, विरार आणि मीरा भाईंदर शहरात रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे. ढगाळ वातावरण असून, वसई विरार आणि मीरा भाईंदरमध्ये अधून मधून पावसाची रिपरिप सुरु आहे.
मुंबईसह उपनगरात गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस झाला आहे, त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं.
काही भागांतील रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. कुलाबा वेधशाळेने रविवारी सकाळी 8.30 वाजता संपलेल्या 24 तासांत 86 मिमी पावसाची नोंद केली. तर उपनगरातील प्रतिनिधी सांताक्रूझ हवामान केंद्राने याच कालावधीत 176.1 मिमी पावसाची नोंद केली, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने (IMD) दिली आहे.
मुंबईत काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.
image 11