Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली! डॉक्टरांची टीम दाखल
त्यामुळे उपोषणाचा परिणाम आता त्यांच्या प्रकृतीवर पण होताना पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाही वेळापूर्वी आरोग्य विभागचं एक पथक उपोषणास्थळी दाखल झाले आहेत.
दरम्यान मनोज जरांगे यांची बीपी कमी झाली असून त्यांच्या किडनीवर परिणाम होत असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहेत.
यावेळी बोलतांना डॉक्टर म्हणाले की, मनोज जरांगे यांचे रक्त चाचणी झाली आहे.
तर ते पाणी पित नसल्याने युरिन आऊटपूट कमी होत आहे.
सध्या एक सलाईन लावण्यात आले असून, त्यांची प्रकृती पाहता पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचं डॉक्टर म्हणाले आहेत.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी गावात गेल्या दहा दिवसांपासून मनोज जरांगे उपोषण करत आहे.
दरम्यान कालपासून त्यांची प्रकृती बिघडत असल्याने त्यांना डॉक्टरांकडून उपचार करण्यात येत आहे.
मनात जरांगे यांना काल सलाईन लावण्यात आली होती.
तर आज देखील डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांना सलाईन लावण्यात आली आहे.