Dahi Handi: देशभरात दहीहंडीचा उत्साह; पाहा निरागस बालगोपाळांचे मह मोहून टाकणारे फोटो
अनेक शाळांमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटीशनचं आयोजन करण्यात आलं होतं, या दरम्यान छोट्या कृष्णांची लोभस रुपं पाहायला मिळाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया नटखट बालगोपाळाच्या रुपाने अनेकांना भुरळ घातली, त्याची दहिहंडी फोडण्याची शैली देखील अतिशय निरागस आहे.
मुंबईच्या शिवाजी शिक्षण संस्थेने जन्माष्टमीनिमित्त सोहळ्याचं आयोजन केलं होतं, यात बालगोपाळांनी दही हंडी फोडून उत्साह साजरा केला.
लहान मुलांना सुंदर असं सजवून पालकांनी पाठवलं होतं.
सर्व छोट्या कृष्णांनी आनंदाने हा सण साजरा केला.
यावेळी लहान लहान मुलींनी राधाचा पोशाख परिधान केला होता, तर मुलांनी कृष्णाचा पोशाख परिधान केला होता.
या निरागस मुलांप्रमाणेच अनेकांनी आपल्या लहान मुलांनाही सजवून व्हॉट्सअप स्टेटसला फोटो ठेवले होते.
अमृतसरमधील शाळेत देखील जन्माष्टमीचा उत्साह दिसून आला. लहान मुलं राधा आणि कृष्णाच्या पोशाखात दिसून आले.
मुंबईतील दादर येथील कमला मेहता शाळेतील अंध बाळगोपाळांनी गोपाळकाला मोठ्या उत्साहात साजरा केला.
गेल्या काही वर्षांपासून अंध बाळगोपाळ सुद्धा मोठ्या उत्साहाने गोपाळकालाचा उत्सव साजरा करू लागले आहेत.
आग्र्यात जन्माष्टमीच्या दिवशी यमुना नदीत भगवान कृष्णाच्या जन्माच्या कथेची पुनरावृत्ती साकारण्यात आली.
देशभरात मोठ्या उत्साहात दहीहंडी सोहळा साजरा होत आहे.