महाराष्ट्रात शिंदेशाहीची सुरुवात; एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, पाहा शपथविधी सोहळ्याचे खास फोटो
एकनाथ शिंदे यांनी आज राजभवन येथे झालेल्या समारंभात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली.
एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर ठाण्यामध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे.
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे एकनाथ शिंदेनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने घेतलेली शपथ हे आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य ठरलं
. एकनाथ शिंदेनी देखील आजच्या शपथविधीला बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे स्मरण करत शपथ घेतली
एकनाथ शिंदेंनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या आशीर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे या शब्दांनी शपथेची सुरूवात केली
गोव्याहून आल्यानंतर आज एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला होता.
शपथविधी अगोदर त्यांनी उपस्थित जनतेला नमस्कार करत सर्वांना अभिवादन केलं.