महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीदरम्यान AI ची कमाल; फोटोंमध्ये पाहा नेत्यांचे थक्क करणारे लूक, फडणवीसांनी स्वतः केलंय शेअर
महाराष्ट्रातील राजकीय बदलांच्या काळात AI (Artificial Intelligence) च्या मदतीनं नेत्यांची चित्र तयार करण्यात आली आहेत. यातील काही फोटो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउपमुख्यमंत्री झाल्याबद्दल अजित पवार यांचं अभिनंदन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात अजित पवार यांनी 2 जुलै रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
या फोटोंमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना योद्धा दाखवण्यात आलं आहे. त्यामध्ये शिंदेंच्या मागे भगवा झेंडाही फडकत आहे. रणांगण आहे आणि सीएम शिंदे रणांगणात उभे असल्याचं दिसतंय. सध्या महाराष्ट्र हे राजकीय रणांगण बनलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांचा बुद्धीबळ खेळतानाचा फोटो तयार करण्यात आला आहे. बुद्धीबळाच्या पटावर दोन्ही नेते आमने-सामने आहेत. राजकीय पटलावरही असंच काहीसं घडताना दिसत आहे.
एका फोटोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे दिसत आहे. तेदेखील रणांगणात उभे असल्याचं पाहायला मिळत आहे. श्रीकांत शिंदे लोकसभा खासदार आहेत. दरम्यानच्या काळात घडलेल्या घडामोडींमुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुका त्यांच्यासाठी युद्धापेक्षा कमी नसतील.
देवेंद्र फडणवीसांनी हे फोटो आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहेत. तसेच, या क्रिएटिव्हिटीसाठी अमित वानखेडेंचे आभारही मानले आहेत.
या फोटोंमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचाही एक फोटो आहे. सध्या शिवसेना दोन गटांत विभागली गेली आहे. परंतु, दोन्ही गट बाळासाहेब ठाकरेंनाच आपला आदर्श मानतात.