PHOTO : 'तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं!' महामानवांना अनोखं अभिवादन, होतंय कौतुक

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा महापरिनिर्वाण (Mahaparinirvan Din) दिन असल्याने देशभरातील अनुयायी विविध पद्धतीने त्यांना अभिवादन करत आहेत
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरात सर्व ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे.

भारती विद्यापीठ प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, नवी मुंबई शाळेतील कलाशिक्षक नरेश मारुती लोहार यांनी अनोख्या पद्धतीनं बाबासाहेबांना अभिवादन केले आहे.
लोहार यांनी ज्वारीच्या भाकरीवर डॉ. बाबासाहेबांच्या सहीसह त्यांचे चित्र रेखाटले आहे.
हा अनोखा प्रयोग करून डॉ. बाबासाहेबांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त लोहार यांनी अभिवादन केले आहे.
'आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय र हे गीत बरचं गाजलं होतं.
जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या ,या त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन कलाशिक्षक लोहार यांनी 9 इंच व्यासाच्या ज्वारीच्या भाकरीवर चित्र काढून त्यांना अभिवादन केल्याचं सांगितलं आहे.
लोहार यांच्या या कलेचं सर्वत्र कौतुक होत आहे.