Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे लवकरच मिळणार, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
CM on Ladki Bahin Yojana Update : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या पुढच्या हफ्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलाडकी बहिण योजनेने डिसेंबरचे पैसे कधी मिळणार यासंदर्भात आता मोठी माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.
राज्य विधिमंडळाच्या नागपूर विधानसभा अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी डिसेंबरच्या हफ्त्याबाबत मोठी माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अधिवेशनात मोठी घोषणा करत लाडक्या बहिणींना गूड न्यूज दिली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार या संदर्भातील घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे.
विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळतील, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
राज्य सरकारनं योजना सुरु करताना महिलांना दरमहा 1500 रुपये दिले होते. त्याप्रमाणेच अधिवेशन संपताच डिसेंबर महिन्याचे देखील 1500 रुपये महिलांच्या खात्यात पाठवले जातील.
लाडकी बहीण योजनेचे निकष बदललेले नाहीत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
'लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं आहे. हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यात टाकणार आहोत', असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
लाडकी बहिण योजनेअंतर्गत आतापर्यंत राज्यातील पात्र महिलांना प्रत्येकी 7500 हजार रुपये निधी सरकारकडून देण्यात आला आहे.