Konkan Shimga Utsav : कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह अन् जल्लोष; पाहा खास फोटो
कोकणात सध्या शिमगोत्सवाचा फिवर चढला आहे. कोकणात कोरोनाचे निर्बंध दोन वर्षानंतर उठल्यानंतर शिमगा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचाकरमानी देखील मोठ्या संख्येने आपल्या मूळगावी दाखल झाले आहेत.
कोकणातील प्रत्येक गावात होळीच्या काही रूढी आणि परंपरा पाहायला मिळतात.
काही ठिकाणी असलेल्या होळी आणि त्या ठिकाणचा उत्साह हा पाहण्यासारखा असतो.
रत्नागिरी शहरातील बारा वाड्यांचे ग्रामदैवत असलेल्या श्री देव भैरी मंदिरात दरवर्षी फाल्गुन पोर्णिमेच्या मध्यरात्री मिऱ्या येथील ग्रामदेवतेच्या पालख्यांच्या भेटीचा सोहळा रंगतो.
वर्षातून केवळ एकदाच रंगणाऱ्या अन् डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या या उत्सवाची झलक पाहण्यासाठी हजारो भाविक येतात
ढोल ताशांच्या गजरात मंदिराचा परिसर दणाणून सोडणाऱ्या या सोहळ्याची रंगत अंगावर नक्कीच काटा आणते.
पालखी भेटीच्या या डोळे दिपवणाऱ्या सोहळ्याने रत्नागिरी शहरातील शिमगोत्सवाची सुरुवात होते.
बारा वाड्यांचा राजा श्री देव भैरीबुवा मंदिरा ऐटबाज पालखीत रुपं लावून बसवला जातो. त्यानंतर मध्यरात्री बाराच्या ठोक्याला रंगतो तो दोन देवांच्या पालख्यांचा भेटीचा सोहळा.
सडामिर्या आणि जाकिमिऱ्या येथील श्री देवी नवलाई पावणाई आणि म्हसोबा ग्रामदेवतेच्या पालख्या भैरी देवाच्या भेटीला येतात. देवळाच्या प्रांगणात या दोन पालख्या भेटीचा सोहळा रंगतो.