हिरवा निसर्ग हा भोवतीने, 'राऊतवाडी धबधब्याची सफर' करा मस्तीने; पाणी प्रवाही झाल्याने पर्यटकांची गर्दी

कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही भागात पावसाने दमदार हजेरी लावल्याने पावसाळी पर्यटनाचं केंद्रबिंदू असणारा राऊतवाडी धबधबा प्रवाही झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राज्यभरात पावसाने जूनच्या पहिल्या आठवड्यात दमदार हजेरी लावली होती. मात्र, गेल्या 8 दिवसांपासून गायब झालेल्या पावसाची वाट सर्वजण पाहत आहेत. त्यात, निसर्गरम्य ठिकाणांच्या पर्यटनाचा आनंद घेण्याचीही योजना आखली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावरती जोरदार पाऊस पडत आहे. परिणामी पावसाळी पर्यटनाचा आकर्षण असणारा कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधबा चांगलाच वाहू लागलाय.
राऊतवाडी धबधब्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून व्हिडिओही व्हत्यामुळे आता पर्यटकही गर्दी करताना दिसून येत आहेत. हा धबधबा पाहण्यासाठी कोल्हापूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यातीलही पर्यटक दिसून येतात.
कोल्हापूरचा राऊतवाडी धबधबा सुरू होण्याची वाट येथील पर्यटक पाहत असतात, निसर्ग सौंदर्याचा नजारा असलेलं हे ठिकाण वन डे पिकनिक प्लॅनसाठी उत्तम ठिकाण आहे.
कोल्हापूर शहरापासून 55 ते 60 किलोमीटर अंतरावर हा राऊतवाडी धबधबा असून कोल्हापूरहून - वाडीपीर-हळदी-राशिवडे-कसबा तारळे-सावरधाण-राऊतवाडी अशा मार्गाने येथे जाता येते.
दरम्यान, पाऊसाचा जोर वाढल्यानंतर किंवा धबधब्याचं पाणी वाढल्यानंतर प्रशासना व पोलिसांकडून सुरक्षेचा उपाय म्हणून धबधबा पर्यटकांसाठी बंदही केला जातो.