Fort Conservation Protest : 'गडकिल्ल्यांचं संवर्धन करा', शिवप्रेमींची मागणी; मुंबईत जोरदार आंदोलन
राज्यातील गडकिल्ल्यांची फार दुरावस्था झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआंदोलक सीएसएमटी येथून मंत्रालयाकडे रवाना झाले. मात्र, या आंदोलकांना रोखण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. पहाटेपासून या आंदोलनासाठी राज्यभरातून शिवप्रेमी जमायला सुरुवात झाली होती. सुमारे पाचशे आंदोलक सध्या मंत्रायलयाच्या दिशेने कूच करत आहेत. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना अडवलं आहे.
फोर्ट येथील चाफेकर बंधू चौकामध्ये सगळे आंदोलन जमा झाले आहेत आणि संपूर्ण रस्ता ब्लॉक करण्यात आला आहे. या सर्व आंदोलकांना पोलीस समजावण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र आंदोलक ऐकायला तयार नाहीत.
गेल्या एक तासापासून गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आंदोलन करणारे शिवप्रेमी चाफेकर बंधू चौकात ठाण मांडून बसलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इथे बोलवावे त्यांना निवेदन द्यायचे आहे, अशी आंदोलकांची मागणी आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी (Fort Conservation) स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे, या मागणीसाठी आज मुंबईमध्ये आंदोलन सुरु आहे.
फक्त बंगल्यांना किल्ल्यांची नावे देण्याऐवजी त्या-त्या किल्ल्याच्या संवर्धनाची जबाबदारीही घ्या, अशी आंदोलक शिवप्रेमींची मागणी आहे.
सर्व शिवप्रेमींना मंत्रालयाच्या बाहेर आणि किल्ल्यांची नावे असलेल्या मंत्र्यांच्या बंगले असलेल्या ठिकाणी जायचे आहे. पण पोलिसांनी आंदोलकांना रोखलं आहे.
पोलीस आंदोलकांना पुढे जाऊ देत नाहीत त्यामुळे आंदोलक रस्त्यावरच ठाण मांडून बसले आहेत.
आंदोलन वेगवेगळी शिवगीते गात आहेत. या आंदोलकांना आझाद मैदानात जाऊन आंदोलन करण्यासाठी पोलीस विनंती करत आहेत, मात्र आंदोलक ऐकायला तयार नाहीत.
गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे ही आंदोलकांची मुख्य मागणी आहे.