नोटांची भिंतच जणू! 260 अधिकारी, 120 वाहनं अन् 390 कोटी! 13 तास मोजणी, जालन्यात खळबळ
पश्चिम बंगालमधल्या ईडीच्या धाडीत सापडलेल्या नोटांच्या ढिगाऱ्याची आठवण करून देणारी कारवाई जालन्यात झालीय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजालना इथल्या स्टील कारखानदारांच्या कारखाना आणि घर-कार्यालयावर आयकर विभागानं टाकलेल्या छाप्यात तब्बल 390 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आलीय.
त्यात 58 कोटींची रोकड, 32 किलो सोन्याचे दागिने, हिरे, मोती असा 16 कोटींचा ऐवज जप्त करण्यात आलाय.
विशेष म्हणजे ही रोकड मोजण्यासाठी तब्बल 13 तास लागले.
१ ते ८ ऑगस्ट अशा आठ दिवस चाललेल्या कारवाईत राज्यभरातले 260 अधिकारी, कर्मचारी 120 वाहनांतून जालन्यात पोहोचले होते
कारवाईत सापडलेली 58 कोटींची रोकड 35 कापडी पिशव्यांत पॅक करण्यात आली तेव्हा नोंटांच्या बंडलांच्या भिंतीच उभ्या राहिल्या.
या कारवाईत औरंगाबादमधील एक प्रख्यात लॅड डेव्हलपर आणि व्यापाऱ्याचाही समावेश आहे.
एकाच वेळी वेगवेगळ्या पाच पथकांनी ही कारवाई केली.
कपाटांखाली, बिछान्यांमध्ये तसेच अडगळीतील काही पिशव्यांत रोकड सापडली. सर्वत्र नोटांची बंडलेच बंडले आढळली. स्टील व्यावसायिकांपैकी तिघांकडे रोख रकमेसह सोन्याचे दागिने, बिस्किटे, नाणी, हिरे मिळाले.
सोन्याच्या 32 किलो दागिन्यांची बाजारभावानुसार किंमत 16 कोटी रुपये आहे.