'या' पुरस्कारांनी केलं होतं लतादीदींना सन्मानित
भारतातील सर्वात महान आणि प्रभावशाली गायकांपैकी एक म्हणून लतादीदींना ओळखले जाते. भारतीय संगीत क्षेत्रामध्ये सात दशकांच्या कारकिर्दीतील योगदानासाठी त्यांना भारतीय गानकोकिळा आणि क्वीन ऑफ मेलडी सारख्या सन्माननीय पदव्या मिळाल्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App1969 मध्ये त्यांना पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर, 1999 मध्ये लतादीदींना पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
1974 मध्ये, लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये सादरीकरण करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत्या.
1987 मध्ये लतादीदींना भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवित केले होते.
देशासाठी त्यांच्या योगदानाबद्दल 2001 मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला.
2007 मध्ये फ्रान्स सरकारने त्यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, द लीजन ऑफ ऑनरने सन्मानित केले होते.
त्यांना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 15 बंगाल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशन पुरस्कार, चार फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार, दोन फिल्मफेअर विशेष पुरस्कार, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि बरेच इतर पुरस्कार मिळाले.