PHOTO : मे महिन्यातच बेळगावातील शाळा गजबजल्या, शैक्षणिक वर्षाला प्रारंभ
कर्नाटकातील शैक्षणिक वर्षाला यंदा मे महिन्यापासूनच सुरुवात झाली आहे. आज सोमवार दिनांक 16 मे पासून शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला. गेली दोन वर्षे कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा दरवर्षीप्रमाणे 1 जूनपासून सुरु झाल्या नव्हत्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबेळगावातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा विद्यार्थ्यांनी गजबजलेल्या पाहायला मिळाल्या. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेत रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.
विद्येची देवता सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन शाळा शुभारंभ प्रसंगी विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुलाब फूल देऊन शिक्षकांनी स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या बरोबर आलेल्या पालकांचे देखील फूल देऊन स्वागत करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी देखील शिक्षक आणि मुख्याध्यापक यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी सर्व शिक्षकांचा चेहर्यावर आनंद उत्साह पुन्हा पाहायला मिळाला.
शाळा लवकर सुरु झाल्याने आणि तसेच अभ्यासक्रमाला लवकर सुरुवात होणार असल्याने पालकांसोबत विद्यार्थ्यांनाही आनंद झाल्याचे यावेळी दिसून आले.
दरवर्षीपेक्षा या वर्षी पंधरा दिवसांपूर्वीच उन्हाळी सुट्टीनंतर पुन्हा एकदा शाळा पुन्हा गजबजलेल्या पाहायला मिळाल्या.