In Pics : वेटर ते युट्यूबर; Hindustani Bhau नक्की आहे तरी कोण? वर्षाला कमावतो लाखो रुपये
हिंदुस्थानी भाऊ सध्या चर्चेत आहे. दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन नको, ऑनलाईन घेण्यात याव्यात या मागणीसाठी राज्यभरात विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकरले आहे. या आंदोलनामुळे हिंदुस्थानी भाऊ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरुको जरा, सबर करो... हा डायलॉग तुम्ही सोशल मीडियावर अनेकदा ऐकला अथवा पाहिला असेल. या डायलॉगमुळेच हिंदुस्थानी भाऊ प्रसिद्धीझोतात आला आहे.
सलमान खानचा प्रसिद्ध शो बिग बॉस 13 मध्ये हिंदुस्थानी भाऊने सहभाग घेतला होता. हिंदुस्थानी भाऊचं खरं नाव विकास फाटक असे आहे.
कोरोना नियम मोडल्यामुळे मुंबई पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊला बेड्याही ठोकल्या होत्या. दादरमधील शिवाजी पार्कमध्ये गेल्या वर्षी हिंदुस्थानी भाऊ विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करा, परीक्षा शुल्क माफ करा या मागणीसाठी आंदोलनाला बसला होता. त्यावेळी कोरोना नियमांचं उल्लघंन केलं म्हणून पोलिसांनी भाऊला ताब्यात घेतलं होतं.
युट्यूबवर प्रसिद्ध होण्याआधी हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक एक पत्रकार होता. क्राईम रिपोर्टिंगसाठी 2011 मध्ये विकास पाठकला पुरस्कारही मिळाला आहे.
बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी विकास पाठक भारत-पाकिस्तान संबधावर यु्टयूब व्हिडीओ तयार करत होता. यामध्ये तो अनेक वादग्रस्त वक्तव्य अन् शिवीगाळही करत होता. त्यामुळे तो अल्पवधीच प्रसिद्ध झाला.
हिंदुस्थानी भाऊच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्याला सातवीत असतानाच वेटरची नोकरी करावी लागली होती. याशिवाय तो घरोघरी अगरबत्तीदेखील विकायचा. हिंदुस्थानी भाऊचे यूट्यूबवर 5.40 लाख सबस्क्रायबर्स आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो युट्यूबद्वारे वर्षाला 40-50 लाख कमावतो.