In Pics | पंढरपुरात धनत्रयोदशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मातेला हिऱ्यांच्या दागिन्यांचा साज
देशभरात यंदाची दिवाळी कोरोना संकटात साधेपणाने साजरी केली जात आहे. असं असलं तरी दिवाळी साजरी करतानाचा उत्साह मात्र तोच आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिवाळीत दिव्यांची आरास लावून, आकर्षक रोषणाई करत, फराळ या गोष्टींसह उत्साह आनंद साजरा केला जातो. दीपावलीची सुरुवात धनत्रयोदशीपासून होते.
दिवाळीमध्ये धनत्रयोदशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याकडे असलेल्या संपत्ती, धनाची या दिवशी पूजा केली जाते. बरेच जण या दिवशी सोन्याची खरेदी करतात.
आज दीपावलीच्या धनत्रयोदशी दिवशी रात्री विठुरायाला ठेवणीतील पारंपरिक अलंकाराने नटविण्यात आले .
रुक्मिणीमातेलाही अतिशय ठेवणीतील पारंपरिक दागिने परिधान करून नटविण्यात आले .
आज मंदिर समितीकडून विठ्ठल रुक्मिणी गाभारा , चौखांबी , सोळखांबी , विठ्ठल आणि रुक्मिणी सभामंडपात हजारो पणत्यांचा दीपोत्सव करण्यात आला .
व्यापारी, सराफ आणि शेतकऱ्यांमध्ये या सणाला विशेष महत्त्व दिलं जातं.
आपल्याकडे असलेल्या धनलक्ष्मीबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे, धनतेरस किंवा धनत्रयोदशी