In Pics : बेळगावात आंतरराष्ट्रीय कुस्तीपटूने गणपती समोर साकारला कुस्तीचा आखाडा
मातीतील कुस्तीच्या संवर्धनासाठी आणि तरुण पिढीमध्ये कुस्तीविषयी आवड निर्माण व्हावी म्हणून आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू पैलवान अतुल शिरोळे याने आपल्या घरातील गणपती समोर बेळगाव येथील ऐतिहासिक आनंदवाडी कुस्ती आखाड्याचा देखावा साकारला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअतुल याच्या घरातील मूर्ती देखील शक्तीचे प्रतीक असलेल्या गदेवर विराजमान झालेली आहे.
मुचंडी येथील शिरोळे यांच्या घरातील देखावा पाहण्यासाठी गणेशभक्त गर्दी करत आहेत.
शिरोळे कुटुंबीयात अनेक पिढ्यांपासून कुस्तीची परंपरा आहे. अतुल याचे आजोबा गुंडू आणि वडील सुरेश शिरोळे हे देखील नावाजलेले मल्ल आहेत.
अतुल याने देखील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत विविध पदके, पुरस्कार मिळवले आहेत.
कुस्तीवर असलेल्या नितांत प्रेमातून अतुल यांनी बेळगावच्या ऐतिहासिक आनंदवाडी आखाड्याची प्रतिकृती सादर केली आहे.
कुस्ती खेळाचे संवर्धन व्हावे, बेळगावची कुस्ती परंपरा तरुण पिढीला समजावी आणि तरुण कुस्तीकडे वळावेत म्हणून घरातील गणपती समोर कुस्तीच्या आखाड्याचा देखावा सादर केल्याचे आंतरराष्ट्रीय मल्ल अतुल शिरोळे यांनी सांगितले.