शेतकरी जोडप्याने घातलं वासराचे बारसं, गाव जेवणासह मोठा उत्सव, पाहा फोटो
नांदेड जिल्ह्यातील एका शेतकरी जोडप्याने तर चक्क गायीच्या वासराचं बारसं घातलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखानापूर येथील पशुपालक शेतकरी मारोती मारजवाडे आणि त्यांची पत्नी आरतीबाई मारजवाडे यांनी आपल्या गायीच्या वासराचे बारसे घातले आहे.
मारजवाडे यांना लॉकडाऊन काळात रस्त्याच्या कडेला बेवारस तडफडत पडलेले दिव्यांग गायीचे वासरु आजपासून दोन वर्षापूर्वी सापडले होते.
त्या वासराचे पालण-पोषण करुन त्यांनी त्याला वाढवले. आता या गायीला वासरु झाले असून त्याचा आज नामकरण सोहळा ठेवण्यात आला होता.
या नामकरण सोहळ्यासाठी संपूर्ण गावाला जेवण ठेवल्याचंही समोर आलं आहे.
दरम्यान महात्मा बसवेश्वरांच्या नावावरून या वासराचे नाव बसवान्ना ठेवण्यात आले आहे.
मारजेवाड जोडप्याने लहाणपणापासून या गायीचा सांभाळ केल्यामुळे संपूर्ण मारजवाडे कुटुंबाला लळा लागला.
आज दोन वर्षांनंतर ह्या गायीने वासरास जन्म दिला आहे. त्यामुळे आनंदून गेलेल्या मारजेवाड कुटुंबाने वासराचे बारसे घालत गाव जेवण देखील ठेवले आहे.