Photo Gallery : हमालाचा मुलगा बनला PSI! संकटाला भेदून यशाला गवसणी
घोड्यावर बसून काढलेली ही मिरवणूक आहे ज्ञानेश्वर देवकते याची. ऊसतोड मजुराच्या कुटुंबात जन्माला आलेल्या ज्ञानेश्वरने परिस्थितीवर मात करून पोलीस निरीक्षक होण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appघरी अठरा विश्व दारिद्र्य.. आई वडील दोघेही मोलमजुरी करणारे.. शिकून मोठं व्हायचं स्वप्न या घरातील तरुणाने पाहिले. आई-वडिलांसोबत कामात तर मदत केलीच. पण स्वतः कृषी दुकानात काम करत स्पर्धा परीक्षेची तयारी केली.
दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर डोंगरा एवढ्या संकटाला भेदून यशाला गवसणी घालणे शक्य होते. हेच राज्यातल्या अनेक शेतकरी आणि शेतमजूरांच्या मुलांनी नुकत्याच झालेल्या पीएसआय (PSI) परीक्षेतून दाखवून दिले आहे.
खाकी वर्दी अंगावर असावी असं स्वप्न पाहणाऱ्या एका तरुणाने मिळेल ते काम करून अभ्यास केला. आणि बीड (beed) जवळच्या शिदोड मधला ज्ञानेश्वर देवकते हा तरुण पीएसआय झाला.
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्याने 248 गुण मिळवले आहेत. ज्ञानेश्वरचे आई वडील ऊसतोड मजूर आहेत मोलमजुरी आणि स्वतःच्या तीन एकर शेतीतून त्यांचा उदरनिर्वाह चालतो
पोलिस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्ञानेश्वरने पाच वर्ष अथक परिश्रम घेतले. मोठ्या शहरात जाऊन अभ्यास करणं परिस्थितीमुळे शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी बीड मध्येच राहून आपला अभ्यास पूर्ण केला.
ग्रामीण भागातील अनेक मुलं-मुली स्पर्धा परीक्षेसाठी आपलं गाव, घर सोडून शहरामध्ये अभ्यासासाठी जात आहेत. पण काबाडकष्ट करून स्पर्धा परीक्षांसारख्या अवघड परीक्षेला सामोरे जाऊन त्यात यश मिळवणं, हे नक्कीच स्पर्धा परिक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत उदाहरण आहे.