PHOTO : हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनी औरंगाबादमध्ये कार्यक्रम; मुख्यमंत्र्यांकडून मराठवाड्यासाठी अनेक घोषणा
आज हैदराबाद मुक्ती संग्राम (Marathwada Mukti Sangram Din) दिन. भारताच्या स्वातंत्र्यानंतर 13 महिने मराठवाड्यातील लोकांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान, 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाने आत्मसमर्पण केले. त्यानंतर मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावत ध्वजारोहण केले.
यावेळी त्यांनी मराठवाड्यासाठी विविध घोषणा केल्या.
मुख्यमंत्री म्हणाले की, मराठवाडा मुक्ती संग्रामात सहभागी होऊन आपले रक्त सांडणाऱ्या सर्वच ज्ञात अज्ञात वीरांना त्यांनी दिलेल्या बलिदानाबद्दल विनम्रतापूर्वक अभिवादन.
हा लढा सोपा नव्हता मात्र रझाकारीच्या जोखडातून स्वतःची मुक्तता करून स्वातंत्र्याची पहाट अनुभवण्यासाठी या वीरांनी जे बलिदान दिले त्याबद्दल त्यांचे राज्यातील जनतेच्या वतीने आभार मानले.
त्यांच्या बलिदानातून स्वतंत्र झालेल्या मराठवाड्यातील विकासाचा अनुशेष भरून काढू असे आश्वासन देत त्यांनी यावेळी विविध घोषणा केल्या.
केंद्र सरकारकडून स्वच्छता भारतसाठी 12000 कोटी मिळाले मिळाले असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
मुख्यमंत्री म्हणाले की, दुष्काळ कमी झाला पाहिजे, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात वळवले पाहिजे, विकास कामाचा आम्ही वॉर रूम मधून आढावा घेत आहोत.
जो काही बॅकलॉक आहे तो भरून काढण्याचं काम महाराष्ट्र सरकार करेल. मराठवाडा वाटर ग्रीडसह सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण झाले पाहिजे यासाठी प्रयत्न करणार आहे. प्रत्येक समाजातील घटकांचं सरकार आहे, असं ते म्हणाले.