Bhandara Dam : भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाची दमदार हजेरी, धरणात 75 टक्के पाणीसाठा
भंडारदरा धरण आणि मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 24 तासात जोरदार पावसान हजेरी लावली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणात 75 टक्के पाणीसाठा झाला आहे.
तर मुळा धरणाचा पाणीसाठा ही 45 टक्क्यांवर पोहोचला आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं भंडारदर्यामध्ये निसर्गाने हिरवीगार शाल पांघरली आहे.
अनेक ठिकाणी छोटे मोठे धबधबे हे प्रवाहित झाले असून उंचावरून पडणारे धबधबे आता पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत.
तर दुसरीकडे बळीराजा शेतीसाठी वरदान असणाऱ्या धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असल्याचं चित्र आहे.
एकीकडे नगर जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही.
त्यामुळे शेतकरी सुखावला असला तरही समाधानकारक पावसाची प्रतिक्षा शेतकऱ्यांना आहे.