सावधान! महाराष्ट्रासह इतर भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा
देशातील वातावरणात बदल झाला आहे. तापमानात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशातील बहुतांश भागात तापमानाचा पारा 40 अंशाच्या आसपास गेला आहे.
वाढतं तापमान हे सर्वांसाठीच धोक्याची घंटा आहे.
पुढील दिवस महाराष्ट्रातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
3 ते 5 मे दरम्यान मध्य भारतात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
पुढील 5 दिवसांत महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा
रात्रीही उकाड्याचा आणि उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा दिलाय.
गंगेच्या खोऱ्यातील पश्चिम बंगाल, पूर्व झारखंड, उत्तर ओडिशा आणि रायलसीमा येथे 3 मे पर्यंत कमाल तापमान 44 ते 47°C च्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
तेलंगणा, कर्नाटक मध्यवर्ती भाग, आंध्र प्रदेशमध्ये उष्णता वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र, गुजरात राज्यातील तुरळक भागात 5 मे पर्यंत आणि मराठवाड्यातील तुरळक भागात 3 ते 5 मे दरम्यान उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.