Samruddhi Mahamarg Highway Accident: आरोपीला घेऊन जाणाऱ्या हरियाणा पोलिसांच्या वाहनाला अपघात, महिला पोलीस निरिक्षकाचा मृत्यू,
समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर महामार्गावरील अपघातांची (Samruddhi Mahamarg Accident) संख्या देखील वाढली आहे. मात्र, सतत होणाऱ्या अपघातांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआरोपीला हरियाणा येथे घेऊन जाणाऱ्या हरियाणा पोलिसांचे वाहन वर्ध्या नजीक समृद्धी महामार्गावर ट्रकला धडकले
या घटनेत हरियाणाच्या पंचकुला पोलीस ठाण्यातील महिला पोलीस निरिक्षकाचा मृत्यू झाला आहे तर चालकासह चार जण गंभीर जखमी झाले आहे.
परभणी येथून आरोपीला घेऊन हरियाणा पोलिस समृद्धी महामार्गाने जात होते.
दरम्यान वर्ध्याच्या येळाकेळी येथील पांढरकवडा शिवारात हरियाणा पोलिसांचे वाहन समोर असलेल्या ट्रकला उजव्या बाजूने धडकले
या पोलीस वाहनात 5 व्यक्ती होते. महिला पोलीस निरीक्षक नेहा चव्हाण यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.
या गंभीर अपघातात वाहन चालक शमी कुमार, सविदर सिंग, वैदनाथ शिंदे, बिटू जागडा हे जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
अपघातात हरियाणाच्या पंचकुला पोलीस ठाण्यातील महिला पोलीस निरीक्षकांचा मृत्यू,पोलीस वाहनातील इतर चार जण जखमी
जखमींना उपाचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविले, परभणीहून नागपूर मार्गे हरियाणाला चालले होते पोलिस वाहन
समृद्धी महामार्गावर मागील काही दिवसात सातत्याने अपघात होत असल्याने चिंता वाढली आहे.